पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लेप शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लेप   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : भिंतीला दिला जाणारा चुना, माती इत्यादींचा थर.

उदाहरणे : सध्या घराच्या भिंतीना गिलावा देण्याचे काम सुरू आहे

समानार्थी : गिलावा, पलिस्तर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दीवारों आदि पर लगाया जानेवाला सीमेंट, चूने आदि के गारे का मोटा लेप।

नया पलस्तर करने के लिए वह घर के पुराने पलस्तर को तोड़ रहा है।
पलस्तर, प्लास्टर
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : फोड इत्यादींवर लावायचा औषधी द्रव्यांचा ठेचा.

उदाहरणे : गळवावर वैद्याने झाडपाल्याचा लेप लावला

समानार्थी : ओढा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

घाव पर लगाया जाने वाला औषध का लेप।

वह घाव पर किसी औषध का लेप लगा रहा है।
आलेप, लेप
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : कापडामधे कापूस घालून शिवून बनवलेले पांघरायचे एक वस्त्र.

उदाहरणे : लोक थंडीत दुलई ओढून झोपतात.

समानार्थी : दुलई, रजई, रजाई


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का रूईदार ओढ़ना।

लोग अधिक ठंड से बचने के लिए रजाई ओढ़कर सोते हैं।
रज़ाई, रजाई, लिहाफ, लिहाफ़

Bedding made of two layers of cloth filled with stuffing and stitched together.

comfort, comforter, puff, quilt
४. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : एखाद्या वस्तूवर लावलेला दुसर्‍या वस्तूचा थर.

उदाहरणे : तो भिंतीवर मातीचा लेप लावत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी चीज़ की वह तह जो किसी वस्तु पर चढ़ाई जाए।

कुम्हार मटके पर मिट्टी का आलेप लगा रहा है।
आलेप, कोटिंग, प्रलेप, लेप

A thin layer covering something.

A second coat of paint.
coat, coating

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.